34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्राइमबँक डेटा चोरी प्रकरणात एकास अटक

बँक डेटा चोरी प्रकरणात एकास अटक

एकमत ऑनलाईन

पुणे : बँक खातेदारांची गोपनीय माहिती चोरी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला गुजरातमधील वापी शहरातून अटक केली. त्याने पुण्यातील आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम केले होते. न्यायालयाने आरोपीला पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दिलीप लालजी सिंग (३०, रा. वापी, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खासगी बँकांमधील नागरीकांच्या सक्रीय व निष्क्रीय बँक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती आरोपींनी काही व्यक्तींच्या मदतीने चोरली होती.

गोपनीय माहिती पुण्यातीलच काही व्यक्तींना विक्री करण्यासाठी आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने १६ मार्चला त्यांना अटक केली होती. आरोपींकडे असलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये तब्बल २२५ कोटी चोरी करणार होते. त्यापुर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी परराज्यात जाऊन काही जणांना अटक केली होती. आरोपींना मोबाईल डेटा पुरविण्याचे काम गुजरातमधील वापी येथील एकाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

ओटीपी शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या