19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeक्राइमतबला मारून एकाची हत्या

तबला मारून एकाची हत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली येथील आर. के. पूरम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील गुरुद्वारामध्ये किर्तनादरम्यान दोन कर्मचा-यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका कर्मचा-याने दुस-या कर्मचा-याच्या डोक्यात तबला घातला आणि त्यातच त्या कर्मचा-याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली असून, मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रंिवद्र सिंग असे आहे.

मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही या गुरुद्वारामध्ये ग्रंथी (म्हणजेच धर्मग्रंथ वाचणारी व्यक्ती) म्हणून काम करत होते. गुरुद्वाराच्या देखभालीचे कामही ग्रंथीच करतात. गुरुद्वारामधील कर्मचा-यांसाठी असणा-या खोल्यांमध्ये हे दोघेही राहत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आर. के. पूरम येथील सेक्टर सहामध्ये असणा-या या गुरुद्वारेत दोघांमध्ये वाद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तबल्याचा वापर करुन डोक्यावर अनेकदा टपली मारल्याप्रमाणे हलका धक्का देत आरोपी दर्शन हा रविंद्र्रला त्रास देत होता. मात्र दर्शन वारंवार असे करत असल्याने रविंद्र्र संतापला आणि त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दर्शनने रंिवद्रच्या डोक्यात तबला घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने रविंद्रचा मृत्यू झाला.

फ्रांस मध्ये नवीन सुरक्षा कायद्यांच्या विरोधात निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या