Sunday, September 24, 2023

पंढरपूर  : पत्नीचा खून करून आरोपी भल्या पहाटे ठाण्यात हजर

पंढरपूर  : पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथील 21 वर्षीय विवाहितेचा धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. आज शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

विवाहितेचा पोटावर धारदार शास्त्राने वार करून खून

घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले आहे. पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली भागात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निकिता आकाश पवार या विवाहितेचा पोटावर धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार घटनास्थळी पोहोचले आहेत.

पाच महिने पूर्वी निकिता बरोबर लग्न झाले होते

चारित्र्याच्या वर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करून पती स्वतःहुन पोलीस स्टेशनला हजर झाला. निकिता आकाश पवार (वय 21 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पंढरपूर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, कुंभार गल्ली येथील रहिवाशी आकाश पवार (वय 23) याचे पाच महिने पूर्वी निकिता बरोबर लग्न झाले होते.

कुंभार गल्ली परिसरात खळबळ

आकाश याने निकिताच्या चरित्रावर संशय घेऊन मध्यरात्री निकिताचा खून करून स्वतः हुन सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. पतीने पत्नीचा खून केलेमुळे कुंभार गल्ली परिसरात खळबळ उडाली आहे.

Read More  सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे, प्लास्टिकच्या बॅगेत मुंडके

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या