नवी दिल्ली : अपहरण,लैंगिक अत्याचार आणि वेश्याव्यवसासाठी भाग पाडण्यात आलेल्या १५ वर्षीय मुलीची शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुटका केली. ती दिल्ली शहरातील नेबसराय येथील घरातून बेपत्ता झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी योगायोगाने तिच्या घरापासून सुमारे दोन किलोमीटरवर सापडली, तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ती तिच्या आजी-आजोबांसोबत दोन वर्षांपासून राहत होती.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलीला तिचा आजीने ‘मोबाईल फोनच्या व्यसनामुळे’ रागावल्यानंतर ती घर सोडून निघून गेली. एक दिवस उलटल्यानंतर तिचा पत्ता काही लागत नव्हता. तेंव्हा तिच्या नातेवाईकांनी नेबसराय पोलिसांत तक्रार दिली.
डीसीपी (दक्षिण) चंदर चौधरी यांनी दावा केला, घरातून बाहेर पडल्यानंतर १५ वर्षांच्या मुलीची, तिच्या ओळखीच्या एका अल्पवयीन मुलाशी भेट झाली होती. राग शांत होई पर्यंत तू माझ्याच येथे रहा असे त्याने पटवून सांगितले व आपल्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
वेश्याव्यवसायात भाग पाडण्यात आले :
अपहरण करणे, दुखापत करणे, बलात्कार करणे, धमकी देणे, महिलेची विनयभंग करणे तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण ‘पोस्को’ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.