16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्राइमपुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई ; १ लाखाचे मेफेड्रॉन जप्त

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई ; १ लाखाचे मेफेड्रॉन जप्त

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. एक लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन किंवा म्याव म्याव हे ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणी २६ वर्षीय तरुणाला अटक केली. या आरोपीच्या माध्यमातून या ड्रग पुरवठ्याच्या साखळीत आणखी किती लोक कार्यरत आहेत याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

धनकवडीतील राऊतबाग परिसरात एक व्यक्ती मेफेड्रॉन विकण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून पर्वती दर्शन परिसरात राहणा-या रोहन काळूराम खुडे या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुडे एका कापड व्यापा-याच्या दुकानात काम करतो आणि त्याने अलीकडेच कपड्याच्या विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला स्टॉल सुरू केला होता.

नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर खुडेचा शोध घेण्यात आला. त्याच्याकडून अवैध बाजारात १.०४ लाख रुपये किमतीचे ६.९ ग्रॅम ‘म्याव म्याव’जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर पोलिस पथकाने त्याला अटक केली आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात खुडेविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही संशयिताची पुरवठा साखळी आणि नेटवर्क पाहत आहोत. तो मुंबईतील एका व्यापा-याकडून विकत घेत असे आणि पुण्यात छोट्या पॅकेटमध्ये विकत असे, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे, असेही पोलिस म्हणाले मेफेड्रोन, ज्याला ‘म्याव म्याव’ किंवा ‘व्हाईट मॅजिक’ म्हणूनही ओळखले जाते. हे अ‍ॅम्फेटामाईन आणि कॅथिनॉन श्रेणीचे कृत्रिमरीत्या तयार केलेले उत्तेजक ड्रग आहे.

२०१० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत कायद्यांतर्गत निषिद्धाच्या यादीत हे ड्रग समाविष्ट नव्हते. परंतु मोठ्या प्रमाणात ड्रगच्या अनेक जप्ती आणि मोठ्या शहरांमध्ये अमली पदार्थ म्हणून त्याचा वापर करण्याच्या वाढत्या घटनांमुळे अधिका-यांना २०१५ मध्ये यादीत समाविष्ट करण्यास सांगण्यात आले होते.

ड्रग पुरवठा साखळीचा शोध सुरू
पुण्यात सध्या ड्रग्जवरील कारवाईचे प्रमाण वाढवले आहे. माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जात आहे. त्यामुळे ड्रग्ज विक्रेत्यांवर आळा बसत आहे. या प्रकरणात जे आरोपी सापडत आहेत त्यांच्यामार्फत ड्रग्ज विक्रेत्यांची साखळी पकडण्यासाठी मदत घेत आहेत. ड्रग्ज पुरवठा साखळीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या