मुंबई : लग्न होऊन एक महिना होत नाही, तोच पतीने पत्नीला लोकल रेल्वेतून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लाईनवरील गोवंडी परिसरात ही घटना घडली असून, महिलेचा मृत्यू झाला आहे. पत्नीला ढकलून देत असताना लोकलमधील एका प्रवासी महिलेने बघितले. त्यामुळे ही घटना समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अन्वर अली शेख असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याचे एका महिन्यापूर्वी पूनम चव्हाण या महिलेसोबत लग्न झाले होते. पूनमचे हे दुसरे लग्न होते़ तिला पहिल्या पतीपासून तीन वर्षांची एक मुलगी आहे. पूनमने अन्वर शेखसोबत दुसरे लग्न केल्यानंतर ती मानखुर्दमधील चाळीत राहायला आली होती. अन्वर व पूनम दोघेही बेरोजगार होते. छोटी-मोठी कामं करून ते उदरनिर्वाह चालवायचे अशी माहिती समोर आली आहे.
सोमवारी (११ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास पूनम व शेख हे लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी अन्वर शेखने पूनमला भरधाव लोकलमधून ढकलून दिले. यावेळी त्या डब्यातून प्रवास करणाºया महिलेने ही घटना बघितली. त्यानंतर त्या महिलेने तात्काळ याची माहिती मानखुर्द पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अन्वर शेख याला अटक केले.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, आता राज्य मानवी हक्क आयोगाच्या आयुक्तपदाची जबाबदारी !