24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइमखवा बनविणा-या दूध डेअरीवर छापा; कंदलगाव येथील कारवाई

खवा बनविणा-या दूध डेअरीवर छापा; कंदलगाव येथील कारवाई

एकमत ऑनलाईन

एक लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त; व्यवसाय बंद करण्याची नोटीस
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मिल्क पावडरपासून खवा बनविणा-या दूध डेअरीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. एक लाख ६८ हजार ८१४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

भेसळयुक्त खवा तयार केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला समजली होती. मिळालेल्या माहितीवरून कंदलगाव येथील हकमाराम चौधरी यांच्या चौधरी दूध डेअरीवर छापा टाकला तेव्हा तेथे मदनराम पटेल यांच्याकडून कृत्रिमरीत्या खवा बनविण्याचे काम सुरू होते. अस्मिता टोणपे यांनी खवा व इतर भेसळयुक्त अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले.

२७ हजार रुपये किमतीचा १५० किलो खवा, १८ हजार ९१४ रुपये किमतीचे १०५ किलो पामोलीन तेल, ५७ हजार ६०० रुपये किमतीचे १६० किलो हिमालया कंपनीची स्किम्ड मिल्क पावडर, २८ हजार ८०० रुपये किमतीची ८० किलो महादेव कंपनीची स्प्रे ड्राईड स्किम्ड मिल्क पावडर, १० हजार ५०० रुपये किमतीची ३०० किलो साखर, २६ हजार रुपये किमतीचे १९५ किलो वनस्पती असा एकूण एक लाख ६८ हजार ८१४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित मालकाला तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. खव्याचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई केली जाईल. शहर व जिल्ह्यातील मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी अशा कृत्रिम खव्यापासून मिठाई बनवू नये. तसे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या