28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्राइमरायगड जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

रायगड जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

एकमत ऑनलाईन

रायगड : तालुक्यातील तांबडी परिसरातील ताम्हणशेत येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने केलेल्या दुष्कृत्याची कबुली दिली असून, बलात्कार आणि हत्येच्या या घटनेमुळे तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे.

१४ वर्षीय मुलगी रविवारी (२६ जुलै) सायंकाळपासून बेपत्ता होती. सायंकाळी ५.४५ वाजता स्कूटीवरून ती शेतावर असलेल्या वडिलांना घरी आणण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र ८ वाजले तरी ती न परतल्यामुळे कुटुंबीय आणि आजूबाजूच्यांकडून तिचा शोध सुरू होता. अखेर रात्री उशिरा गावाबाहेर तिची स्कूटी दिसून आली. अधिक शोध घेतला असता रात्री ९.३० वाजता वाळव्याचा कोंड ओहोळाजवळ एका मोठ्या खडकावर या मुलीचा मृतदेह विवस्त्र आणि मृत अवस्थेत सापडला. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करून काहींना संशयावरून ताब्यात घेतले.

घटनास्थळी दाखल झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगात फिरविण्यात आली. अवघ्या १२ तासांतच ताम्हणशेत परिसरातून एका २० वर्षीय तरुणाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याला ‘बोलता’ करताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आडबाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत.

या प्रकरणी रोहे पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (१), ३०२, २०१, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी ताम्हणशेत येथे जाऊन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. मुलीचा मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Read More  जगातील सर्वच घटना या अरेखीय तत्वावर चालतात

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या