34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home क्राइम महिला पोलिसासोबतचे संबंध तरुणाला पडले महागात

महिला पोलिसासोबतचे संबंध तरुणाला पडले महागात

एकमत ऑनलाईन

पिंपरी : पिंपरीतील पोलिस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे परत देण्याचे आमिष दाखवून नातेवाइकांच्या मदतीने ५ डिसेंबर रोजी अपहरण केले. इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. आरोपी तरुणाकडून तब्बल दहा लाखांची खंडणी मागितली आणि पैसे देऊ शकत नसल्यास किडनी दे अशी मागणी केल्याचा धक्­कादायक प्रकार उघडकीस आला.

पिंपरी चिंचवड वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई, पुणे पोलीस दलातील कर्मचारी विजय कुमार साळवे, नंदकुमार कांबळे, सनी लोंढे, विनय लोंढे, महिला पोलिस शिपायाची आई आणि अन्य एक महिला, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुरज असगर चौधरी (२१, रा. ओटास्कीम, निगडी) असे अपहरण, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत शुक्रवारी मध्यरात्री वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी महिला पोलिस शिपाई ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. तर आरोपी विजय साळवे हा पोलिस मुख्यालय शिवाजीनगर येथे नेमणुकीस आहे. आरोपी महिला पोलिस हिचे आणि फिर्यादी सुरजचे अनैतिक संबंध होते. तसेच महिला पोलिस हिने फिर्यादी सुरजकडून काही पैसे घेतले होते. ते पैसे देण्यासाठी आरोपीने सुरजला ५ डिसेंबर रोजी थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटी समोर बोलावून घेतले. सुरज ५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजता बोलावलेल्या ठिकाणी गेला. त्यानंतर आरोपींनी सुरजला एका गाडीत जबरदस्तीने बसवून इंदापूर जवळ असलेल्या जंगलात नेले.

तिथे आरोपींनी सुरजला लाकडी दांडक्­याने, कोयत्याने मारहाण केली. दरम्यान आरोपींनी सुरजचा मोबाइल फोन घेतला. महिला पोलिस हिने सुरजसोबत असलेले फोटो आणि व्हिडीओ नष्ट करण्याच्या उद्देशाने सुरजचा मोबाइल फोन फोडून फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी सुरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये दे नाहीतर तुझी किडनी दे, अशी धमकी दिली. हा प्रकार ५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा ते दुपारी तीन या कालावधीत घडला. याबाबत आठवडाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड, जीन्स, टी-शर्ट, भडक कपडे, स्लीपर्स घालून कार्यालयात न येण्याची ताकीद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या