29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्राइमसोलापूरात रिक्षाचोर जेरबंद ; २३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूरात रिक्षाचोर जेरबंद ; २३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर: गर्दीचे ठिकाण बघायचे, आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करायची अन् मिळाली संधी की उचलायची, शहर जिल्ह्यातून अशा अनेक रिक्षा चोरून त्या शोध लागू नये म्हणून थेट कर्नाटकात जाऊन व्यवहार करायचा आणि पैसे कमयावचे. तो दलाल र्गि­हाईकाला थोडाफार बदल करून लाखोला विकायचा. एक दिवस त्यांचे बिंग बाहेर पडले आणि पोलिसांनी सापळा लावून दोघांना उचलले. पोलिसी खाक्या दाखवताच तब्बल २३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १६ रिक्षांचा मुद्देमाल जप्त . करण्यात आला.एमआयडी पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातून रिक्षा, दुचाकीची वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गर्दीच्या ठिकाणी अथवा रात्री घरासमोर पार्क केलेली वाहने रातोरात बनावट चावीने चोरीला जाऊ लागली. जिल्ह्यातही असे प्रकार घडू लागले. दररोज पोलिस डायरीमध्येही फिर्यादी नोंद होऊ लागल्या.पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी चो-यांचा छडा लावण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांबरोबरच शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला आदेश दिले होते. यानुसार पथक कामाला लागले, शोध मोहीम सुरू असताना एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदलेल्या गुन्ह्यातील संशयिताची माहिती खब-याकडून पोलीस नाईक चेतन रूपनर, सचिन भांगे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे फिंिल्डग लावून सैद ईरफान यादगिर व बिलाल सलीम गदवाल(रा.गोदुताई परूळेकर घरकुल कुंभारी)यांना ताब्यात घेतले.

या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखं बोलू लागले, शहर आणि जिल्ह्यातून रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघांसह एमआयडीसी, जोडभावी जेलरोड, वळसंग, बार्शी, मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ रिक्षा जप्त करण्यात आल्या. याची किंमत २३ लाख ७० हजार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

ही कारवाई पोलिस आयुक्त राजेंद्र माने उपायुक्त वैशाली कडूकर, सहा. पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सपोनि रोहित चौधरी यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार राकेश पाटील, पोलीस नाईक सचिन भांगे, चेतन रुपनर, मंगेश गायकवाड, अमोल यादव, अनुमान दुधाळ, शंकर याळगी, काशिनाथ वाघे, शैलेश स्वामी, सचिन जाधव, मोहसीन शेख, इकरार जमादार, बागलकोट, नवनाथ लोहार यांनी केली.

या गुन्ह्यातील सैफ यादगिर आणि बिलाल गढ़वाल रिक्षा चोरायचे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्नाटकातील मध्यस्थाला गाठायचे. एक रिक्षा ते ३५ ते ४० हजार रुपयांना विकायचे. मध्यस्थ त्या रिक्षामध्ये फेरफार करून एक लाखाला विकायचे. मात्र, अखेर त्यांच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला. यातील चार रिक्षा शहरातील जप्त केल्या, अन्य पथकाने कर्नाटकात जाऊन जप्त केल्या. चोरीस गेलेल्या इतर रिक्षामालकांचा शोध लागला असून, अन्य पाच जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या