17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeक्राइमपैसे पाहून चोराला हार्टअटॅक

पैसे पाहून चोराला हार्टअटॅक

एकमत ऑनलाईन

बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे अजब गजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका चोराने त्याच्या साथीदारासह घरात चोरी केली. चोरीनंतर त्या दोघांच्या वाट्याला आलेली रक्कम ज्याचा कधीही चोरांनी विचार केला नव्हता. एकदम लाखो रुपये पहिल्यांदाच बघितल्याने एका चोराला हार्ट अटॅक आला, तेव्हा चोरी केलेल्या रक्कमेतून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागले. ही घटना तेव्हा उघड झाली जेव्हा कोतवाली परिसरात मागील महिन्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात दोन चोरांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली.

बिजनौर पोलिस अधीक्षक धर्मवीरसिंह म्हणाले की, १६ आणि १७ फेब्रुवारीला रात्री दोन चोर नवाब हैदर पब्लिक सर्व्हिंस सेंटरमध्ये घुसले होते, त्यांनी आतमध्ये चोरी केली. हैदर यांनी ७ लाखांपेक्षा जास्त चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास करणारÞ्या पोलिसांना बुधवारी नगीना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीपूर येथून ३० वर्षीय दोन आरोपी नौशाद आणि एजाज सापडले, त्यांना अटक करण्यात आली.

३०० किलो हेरॉईनसह एके ४७ चा साठा जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या