22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्राइम कोरोनाबाधित महिलेचा आयसीयूत विनयभंग

कोरोनाबाधित महिलेचा आयसीयूत विनयभंग

एकमत ऑनलाईन

वॉर्डबॉयला अटक : हडपसर भागातील सह्याद्री हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

पुणे : आयसीयु वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉय कडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर भागातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे.

अशोक नामदेव गवळी (40 रा. नवरत्न सोसायटी, वडगावशेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात 35 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तीने दिलेल्या तक्रारीननुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हडपसर भागातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या शुक्रवारी सायंकाळी आयसीयु वार्डमध्ये आराम करीत असताना आरोपी वॉर्डबॉय पीपीई कीट घालून तेथे त्यांच्या बेडजवळ आला. त्याने चेहऱ्यावरील मास्क खाली घेत मला ओळखले का अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादींना मी ओळखत नाही असे उत्तर दिले.त्यानंतरही आरोपींनी फिर्यादीशी जवळीक साधून मोबाईल क्रमांकाची मागणी केली. फिर्यादींना त्याला बेडपासून बाजूला व्हा असे खडसावले असता त्याने फिर्यादीचा विनयभंग केला.

दरम्यान, फिर्यादी त्याला विरोध करीत असताना वॉर्डमध्ये दुसरी एक महिला आल्यानंतर आरोपीने वार्डमधून काढता पाय घेतला. फिर्यादींनी ही बाब हॉस्पिटल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कुटुंबियांना माहिती दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांना माहिती मिळताच आरोपीस अटक केली याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर.आर.पाटील करत आहेत.

Read More  भारतात व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी असल्याने निर्यातीचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या