26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home क्राइम अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी मुलीची जीभ कापली

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी मुलीची जीभ कापली

एकमत ऑनलाईन

आरोपीला अटक केली : गुन्हा दाखल केला,  काही दिवसांनी त्याला सोडून दिलं

हाथरस – कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर आरोपींनी मुलीची जीभ कापली आहे. अलीगढ येथील जेएन मेडिकल कॉलेजमध्ये मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. गावातील चार तरुणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी मुलीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये मुलीला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. गुन्हा दाखल केला होता. मात्र काही दिवसांनी त्याला सोडून दिलं. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेच्या नऊ दिवसांनंतर मुलगी शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली आहे.

पद्मश्री अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या