राजस्थान : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला आहे. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पती अमित गुप्ताला अटक केली आहे.
राजस्थानच्या अलवर भागात अमित गुप्ता या तरुणाने कोमल या महिलेशी 2019 साली लग्न केले होते. कोमलचे यापूर्वी घटस्फोट झाला होता. पहिल्या पतीशी विभक्त झाल्यानंतर तिने अमितशी लग्न केले होते. अमित अलवर भागात इ मित्रचे दुकान चालवत होता. पण लॉकडाऊनमुळे ते बंद ठेवण्यात आले होते. कोमलचे पहिल्या पतीच्या भाच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय अमितला होता. कोमल त्याच्या भाच्यासोबत फोनवर बोलायची म्हणून अमित तिच्यावर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये वादही झाला होता. एकेदिवशी कोमलने तिच्या भाच्याला घराबाहेर हाकलले आणि हे अमितने पाहिले. तेव्हा त्याला खात्री पटली की खरच या दोघांचे प्रेमसंबंध आहे. तेव्हा अमितने कोमला भांग खाऊ घातली. कोमल बेशुद्ध झाल्यानंतर अमितने तिचा गळा दाबून खून केला. आणि तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वेगवेळ्या ठिकाणी फेकून दिले.
पोलिसांना जेव्हा कोमलच्या शरीराचे अवशेष मिळाले तेव्हा त्यांच्यावर दुहेरी आव्हान होते. प्रथम मृतदेहाची ओळख पटवायची होती आणि खुन्याला शोधायाचे होते. तेव्हा राजस्थान पोलिसांनी कसून तपास केला असता अमित गुप्ताची पत्नी बेपत्ता झाल्याचे समोर आले. पोलिसांनी अमितची चौकशी केला तेव्ह अमितने गुन्हा कबुल केला. अमितने २०१३ साली होमगार्डमध्ये असलेल्या आपल्या मैत्रीणवर बलात्कार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर अमित जामिनावर बाहेर पडला होता.
पनवेलमध्ये मनसेने उघडले विरुपक्ष मंदिराचे दार; आंदोलकाना ताब्यात घेतले