25.7 C
Latur
Wednesday, January 27, 2021
Home क्राइम सूनेवर बलात्कार करुन मुलाची हत्या

सूनेवर बलात्कार करुन मुलाची हत्या

एकमत ऑनलाईन

मोरादाबाद: बापाने मोठ्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये घडली आहे. एवढेच नव्हे तर सास-याकडून बलात्कार केल्याचा आरोपही सूनेने केला आहे. आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला असून तो सध्या फरार आहे.

मोरादाबादमध्ये शनिवारी ही घटना घडली. सास-याने २५ नोव्हेंबरला घरात कुणी नसताना बलात्कार केल्याचा आरोप सूनेने केला. तिचा पती आणि अन्य नातेवाईक दुस-या शहरात लग्नसोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी सास-याने बलात्कार केला, असा आरोप तिने केला.

पती आणि सासूला या घटनेबद्दल सांगेन असे ती २५ तारखेला म्हणाली. तसेच पोलिसांत तक्रार करणार असल्याचे तिने सांगितले. त्यावेळी तिचे सास-यासोबत भांडणही झाले. पीडितेचा पती घरी आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपीच्या लहान मुलाने हस्तक्षेप करत त्याची बाजू घेतली.

वाद टोकाला गेल्यानंतर आरोपीने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर आणले आणि मोठ्या मुलाची गोळ्या घालून हत्या केली. घटनेनंतर मुख्य आरोपी आणि त्याचा लहान मुलगा दोघेही फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

बायकोच्या इच्छेसाठी बाईक चोरल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या