34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home क्राइम बायकोच्या इच्छेसाठी बाईक चोरल्या

बायकोच्या इच्छेसाठी बाईक चोरल्या

एकमत ऑनलाईन

सुरत : बायकोच्या इच्छा आणि ऐशोआरामाचे आयुष्य जगता यावे यासाठी सूरतमधील एका हिरे कारागिराने चक्क मोटारसायकल चोरण्यास सुरुवात केल्याचे उघड झाले आहे़ सूरत क्राईम ब्रँचच्या अधिकाºयांनी या बाईक चोराला अटक केली असून बलवंत चौहान असे त्याचे नाव आहे.

बलवंतची पत्नी आपल्या मोठ्या बहिणीच्या ऐशोआरामाच्या लाईफस्टाईला भुलून पतीला जास्त पैसे कमाव असा तगादा लावायची. यामुळे बलवंतने बाईक चोरायला सुरुवात केली. हिरे कारागिर असलेल्या बलवंतला महिना १५ ते २० हजारापर्यंत पगार मिळायचा.

परंतू त्याचा साडू हा बिल्डर असल्यामुळे त्याच्याकडे पैसा असायचा. त्यातच लॉकडाउनमध्ये बलवंतचा रोजगार तुटल्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासायला लागली होती. त्यामुळे बायकोकडून वारंवार टोमणे ऐकायला लागत असल्यामुळे बलवंतने बाईक चोरण्याचा निर्णय घेतला. कापोदरा, वरचा, अमरोली, कातरगाम या भागांत बलवंतने किमान ३० बाईक चोरल्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

चार महिन्यांत नागरिकांना कोरोनावरील लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या