34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeक्राइमआरोपी बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

आरोपी बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. बोठे यास पोलिसांना शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. यावेळी पोलिसांना बोठेच्या खिशाला सुसाईड नोट सापडल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

अडीच महिन्यांनी नगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बाळ बोठेला अटक केली. यावेळी हैदराबाद येथे घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना सुसाईड नोट सापडली. सुसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबियांना संपर्क करा असा उल्लेख या नोटमध्ये आहे. बोठे यास काल हैदराबादमधून अटक केली. त्यानंतर त्याला पारनेर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. आज बोठे यास पारनेर न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. गेल्या तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता.

त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली. तसेच रेखा जरे यांची हत्या त्याने का केली, याचा उलगडा अजून व्हायचा आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील सिध्दार्थ बागले यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बोठेला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बोठेसह त्याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील आरोपींनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात १५ मार्चपासून रात्री ८ ते पहाटे ५ संचारबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या