Thursday, September 28, 2023

एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या करणा-याची आत्महत्या

नागपूर : नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि १० वर्षाच्या भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मनकापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. लक्ष्मीबाई धुर्वे आणि यश धुर्वे अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एकतर्फी प्रेमातून ६५ वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि १० वर्षांच्या यश धुर्वेची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या केली. आरोपी अल्पवयीन होता. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. गुरुवारी रात्री त्याने मनकापूर परिसरात रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुणीच्या मागे होता. यातूनच त्याने तरुणीचे घर गाठले आणि लक्ष्मीबाई व यश यांची धारदार शस्त्राने हत्या केली. घरात झालेल्या गोंधळानंतर शेजा-यांनी धाव घेतली असता दुहेरी हत्याकांड झाल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असतानाच मलकापूर परिसरात रेल्वेसमोर उडी मारून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

तरुणीला मारहाणही करायचा
माहितीनुसार, तो माथेफिरू भेटण्यासाठी त्या तरुणीवर दबाव आणायचा, तिला मारहाण करायचा. १५ दिवसांपूर्वीही त्याने तिला जबर मारहाण केली होती. त्यात तिच्या एका डोळ्याला जबर दुखापत झाली होती. तेव्हा धुर्वे कुटुंबातील काही कौटुंबिक मित्रांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती तरुणी मारहाणीनंतर एवढी जास्त घाबरलेली होती की तिची अवस्था पाहून तिच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला होता.

नड्डा हल्ला प्रकरणात सात जणांना अटक

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या