बुंदी : राजस्थानच्या बूंदी येथे एका खेड्यातील शिक्षकावर बलात्काराचा आरोप आहे. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, शिक्षकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि व्हीडीओ बनवून ब्लॅकमेल करत राहिला. कुटुंबियांनी दबलाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे, असे सांगितले जात आहे की, पीडित मुलगी ९ वी इयत्तेमध्ये शिकते आणि शिक्षक तिसरीच्या वर्गाला शिकवतो.
तो त्या पीडित मुलीला धमकी देऊन घाबरवायचा. त्यामुळे नाईलाजास्तव तिला त्या नराधम शिक्षकाकडे जावे लागत असे. आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याने तीन ते चार वेळा मुलीसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हिंडोली सीआय मुकेश मीणा यांच्याकडे देण्यात आला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.
बीटी तंत्रज्ञानाची कायदेशीर जबाबदारी लवकरच ठरणार