21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeक्राइममुलाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

मुलाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

एकमत ऑनलाईन

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एका तरुणाने उधार घेतलेले पैसे चुकते करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून स्वत:च्या अपहरणाचा कट रचल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने वडिलांकडे खंडणी मागितली. जयपूर पोलिसांनी काही तासांतच या अपहरणाच्या घटनेचा छडा लावला. मालवीय नगरमध्ये एका तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती जयपूर पोलिसांना मिळाली.

अपहरणकर्त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून मुलाच्या वडिलांकडे खंडणी मागितली होती. मुलाचे हायपाय बांधले होते. तसेच दोन जण त्याला मारहाण करत असताना व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ अजमेरच्या केकडीत राहणा-या मुलाच्या वडिलांना पाठवण्यात आला होता. हा व्हिडिओ मोबाइलवर येताच कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी काही तासांतच आरोपींना गजाआड केले. जयपूर पोलिसांनी सांगितले की, केकडी येथील रहिवासी प्रेम सिंह यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अमेरिकेतही निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या