22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्राइम मृतदेह चक्क ड्रममध्ये भरला ; पतिकडूनच पत्नीची हत्या

मृतदेह चक्क ड्रममध्ये भरला ; पतिकडूनच पत्नीची हत्या

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच ओढणीने गळा आवळत पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील घणसोली येथे घडला आहे. पतीने पत्नीची हत्या करत तिचा मृतदेह चक्क ड्रममध्ये भरून तो खोपोली या ठिकाणी टाकला. त्यामुळे नवी मुंबईत या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे.

पतीचे नाव अंबुज तिवारी व पत्नीचे नीलम तिवारी असं आहे. हे दोघे पती पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार अंबुज याच्या वडिलांनी २२ जुलै रोजी रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी याचा तपास केला असता पोलिसांनी पती अंबुजला २८ जुलैला ताब्यात घेतलं. यावेळी आपला गुन्हा अंबुजने कबूल केला.

आपणच आपल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. तसंच तिचा मृतदेह ड्रममध्ये भरून मित्र श्रीकांत चौबे याच्या टेम्पोने नेऊन तो मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोलीजवळ फेकला, असा खुलासा त्याने केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अंबुजचा मित्र श्रीकांत चौबेला देखील अटक केली आहे. तसंच या प्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत.

Read More  राममंदिरासाठी सोन्याची वीट देण्याची मुगल सम्राटांच्या वंशजांची इच्छा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या