26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeक्राइमकार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकले

कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकले

एकमत ऑनलाईन

कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. या दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाला एका व्यावसायिकाला दीड लाखांना विकले आणि त्या पैशातून सेकंड हँड कार विकत घेतली.

आजी आजोबांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. कन्नौजमधील तिरवा कोतवाली भागातील सतौरमध्ये तीन महिन्यांपूर्वी नवजात बाळाचा जन्म झाला होता.

मात्र पैशाच्या हव्यासापोटी आणि कार विकत घेण्यासाठी दाम्पत्याने नवजात बाळाला गुरसहायगंज येथील एका व्यावसायिकाला विकले. अवघे तीन महिन्यांचे बाळ दीड लाख रुपयांना त्यांनी व्यावसायिकाच्या हाती सुपूर्द केले.

दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयाला दिले आव्हान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या