27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्राइमतांत्रिकांच्या सांगण्यावरून वडिलांनी 5 मुलांची केली हत्या

तांत्रिकांच्या सांगण्यावरून वडिलांनी 5 मुलांची केली हत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हरियाणाच्या जींद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील डिडवारा गावात एका वडिलांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून 5 वर्षात आपल्या 5 मुलांना ठार मारले. 17 जुलै रोजी डिडवारा गावातून दोन मुली बेपत्ता झाल्या. जुम्मा असे आरोपीचे नाव आहे. जुम्माने तांत्रिकच्या सांगण्यावरून हे कृत्य केले. हत्या करण्यात आलेल्या सर्व मुलांचे वय 11 वर्षापेक्षा कमी होते. मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी पंचायतीसमोर आला आणि त्याने संपूर्ण प्रकरणाची माफी मागितली, त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले आणि आरोपीला अटक करण्यात आली.

जींद एसपी अश्विन शैणवी यांनी रात्री उशिरा आरोपीला पकडल्याची पुष्टी केली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपीच्या तीन मुली आणि दोन मुलांची हत्या झाल्याची सांगितले जात आहे.

गावातील लोकांनी सांगितले की, आरोपीने पंचायतीसमोर आपला गुन्हा कबूल करताना सांगितले की, त्याने दारिद्र्यामुळे आणि तांत्रिकाच्या इशार्‍यावरुन ही घटना घडली आहे. पंचायत प्रतिनिधी व ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले व कारवाईची मागणी केली. या भीषण हत्येच्या प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्याचा पोलिस सध्या प्रयत्न करीत आहेत.

Read More  एकाच सोसायटीत 70 रुग्ण आढळल्याने खळबळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या