23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home क्राइम चारित्र्याच्या संशयावरून मुलानेच केली बापाची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून मुलानेच केली बापाची हत्या

सोलापूर : नात्याला काळीमा फासणारी आणखी एक घटना सोलापूरमधील माढ्यात उघड झाली. चारित्र्याच्या संशयावरून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा मित्राच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे. 20 वर्षांच्या मुलाने आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

टेंभुर्णी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.मृत संजय काळे यांचा मुलगा आकाश संजय काळे(वय20, राहणार शिराळा) लक्ष्मण बनपट्टे, आलम बासू मुलानी( दोघेही राहणार,सुरली तालुका माढा) केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील लक्ष्मण बनपट्टे सराईत गुन्हेगार असून त्याला खुनात साह्य करण्यासाठी सात हजारांची सुपारी देण्यात आली होती. या तिघांनी संजय काळे यांची हत्या केली आणि त्यानंतर उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत वाहनासह संजय काळे यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा उलगडा करत मुलासह तिघांना अटक केली.

Read More  रशियाने केली ऑगस्टच्या मध्यापर्यंत लस उपलब्ध करून देण्याची तयारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow