21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमदारुचा ग्लास खाली ठेवला म्हणून मित्रानेच केला खून ; पिंपरी-चिंचवडमधील घटना

दारुचा ग्लास खाली ठेवला म्हणून मित्रानेच केला खून ; पिंपरी-चिंचवडमधील घटना

एकमत ऑनलाईन

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये दारूच्या नशेत खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एका व्यक्तीला काठीने आणि दारूच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. दारूचा ग्लास फेकून खून केला. या वादात बालाजी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी नीलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोघांना अटक केली आहे.

मृत बालाजी, नीलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात हे देशी दारुच्या दुकानामागे मद्यपान करत होते. नीलेश आणि बालाजी मद्यपान करत असताना बालाजीने दारूचा ग्लास खाली टाकला. त्या प्रकाराचा नीलेशला राग आला. त्यामुळे नीलेशने बालाजीला काठीने आणि दारूच्या बाटलीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बालाजीचा मृत्यू झाला.

कच-याच्या ढिगा-यात फेकला मृतदेह
बालाजीचा मृतदेह कच-याच्या ढिगा-यात टाकण्यात आला. मृत बालाजी हा नांदेड येथील रहिवासी असून तो सध्या सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. १५ जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्टबिनमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली नाही. शवविच्छेदन करण्यात आले. डोक्यावर वार करून त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. कचरा डंपरचा चालक राजेंद्र याची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. कंट्री बारमध्ये काम करणा-या अखिल आणि धर्मेंद्र यांनी बालाजीच्या अंगावर कचरा टाकला. त्यामुळे त्याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या