जालना : लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने आपल्या होणा-या पत्नीवर बलात्कार करून नंतर गळा चिरून खून केला. मंठा तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर खून करणारा तरुण फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील सुभाष पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च २०२३ रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते.
यावेळी सुशीलही बस्त्यासाठी नातेवाईकांसोबत आला होता. मात्र, तो अचानक गायब झाला. त्याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे.