35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeक्राइमबापाच्या स्वप्नपूर्तीसाठी बकऱ्या चोरल्या

बापाच्या स्वप्नपूर्तीसाठी बकऱ्या चोरल्या

एकमत ऑनलाईन

चेन्नई : मुलांसाठी बाप काहीही करु शकतो असे म्हणतात. मात्र तामिळनाडूमध्ये याच वाक्याच्या अगदी उलट प्रकार समोर आला असून, घडलेली घटना ही एकाद्या कॉमेडी चित्रपटाची पटकथा होऊ शकते अशी आहे. न्यू वाशेरमनपेठ येथील दोन भावांना पोलिसांनी अटक केली असून, हे दोघेजण वडिलांना चित्रपट बनवण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने चक्क बक-या चोरुन विकायचे अशी माहिती समोर आली आहे.

व्ही. निरंजन कुमार (३०) आणि त्याचा भाऊ लेनिन कुमार (३२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे मागील तीन वर्षांपासून बक-या चोरी करायचे अशी माहिती माधवाराम पोलिस स्थानकातील पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आले आहे. या दोघांनाही शनिवारी अटक करण्यात आली. निरंजन आणि लेनिन दिवसाला आठ ते दहा बोकड/बक-या चोरायचे आणि नंतर ते बाजारामध्ये प्रत्येकी आठ हजारांना विकायचे.

चेंगलपेठ, माधवाराम, मिंजूर आणि पोन्नेरी सारख्या ग्रामीण भागामध्ये हे दोघे भाऊ गाडीमधून फिरायचे. रस्त्याच्या बाजूला चरण्यासाठी सोडलेल्या बक-या हे लोकं चोरायचे. बक-यांच्या आजूबाजूला त्यांच्यावर देखरेख करणारे कोणीच नसल्याचे समजल्यास हे दोघे बक-या गाडीत टाकून घटनास्थळावरुन पळ काढायचे. एका कळपातील दोन ते तीन पेक्षा अधिक बक-या चोरायचा नाही, असा त्यांनी नियमच केला होता.

बिहारमध्ये भाजप मजबूत करणे हेच ध्येय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या