29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्राइम जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्ले

जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्ले

एकमत ऑनलाईन

कोच्ची : वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संघर्षात माणूसकी हरवत चालल्याचेही पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शिरलेल्या हत्तीच्या शरिरावर पेटता टायर फेकण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यात त्या हत्तीचा मृत्यूही झाला. तामिळनाडूतील या घटनेनंतर केरळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाण्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

केरळमधील इडुकी येथे घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला. पण, याबाबतची माहिती वन विभागाला न देता पाच जणांनी त्याला ठार केले आणि त्यानंतर त्याचे मास शिजवून खाल्ले़ या प्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार विनोद, कुरिकोस, बीनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावे आहेत. यापैकी विनोदच्या शेतामधील जाळ्यात हा बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वांना बोलावून बिबट्याला ठार मारले आणि त्याचे मांस शिजवून खाल्ले.

वन विभागाने या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीच्या घरी धाड टाकली आणि तेव्हा विनोदच्या घरातून १० किलो मांस व बिबट्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली. बिबट्याची दातं, नखं व कातडे विकण्याचा या सर्व आरोपींची योजना होती. या आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. वन विभागच्या कायद्यानुसार आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळयाचे अनावरण, सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या