23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home क्राइम प्रियकरानेच प्रेयसीचा धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या

प्रियकरानेच प्रेयसीचा धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या

पुणे  : शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानेच आपल्या प्रेयसीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी प्रियकराने हत्येच्या गुन्ह्याची कबुली शिरुर पोलिसांत देत तो स्वत:अटक झाला आहे. सारिका गिरमकर (वय 30) असं हत्या झालेल्या प्रेयसी नाव आहे.

शिरुर येथे दत्तात्रय गायकवाड हा तरुण भाडेतत्त्वावर एका खोलीत राहायला होता. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत खाजगी कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. तर सारिका एका रुग्णालयात कामाला होती. दत्तात्रय याचे सारिका बरोबर प्रेम संबंध जुळले होते. त्यामुळे दोघेही जण वाडा कॉलनी परिसरात सात महिन्यापासून पती-पत्नी म्हणून रहात होते.

सारिका ही आपली पत्नी असल्याचे घरमालक बबन शेटे यांना सांगितले होते. दत्तात्रय गायकवाड हा मूळचा शिंदोडी (ता.शिरुर) येथील रहिवासी आहे. काही दिवसांपासून दत्तात्रय हा सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. 15 दिवसांपासून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. यामुळे खोली मालक असलेल्या शेटे यांनी त्यांना खोली खाली करायला सांगितली होती.

अखेर सोमवारी गायकवाडने सारिकाचा निर्घृण हत्या केली. त्यानंतर दत्तात्रय कंपनीत कामाला निघून गेला आणि स्वतः हून शिरूर पोलीस स्टेशनला हजर होऊन आपणच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली असून या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सारिका गिरमकर या महिलेच्या हत्येप्रकरणी खोलीमालक यांच्या फिर्यादीनुसार प्रियकर दत्तात्रय गायकवाड यांच्या विरुद्ध भादंवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरुर पोलीस करत आहे.

Read More  आईनेच केला 4 वर्षीय चिमुकलीचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow