26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्राइम१५ हजारांची सुपारी देऊन आईनेच मुलाला संपविले

१५ हजारांची सुपारी देऊन आईनेच मुलाला संपविले

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकू या छोट्याशा गावात ही चीड आणणारी घटना घडली आहे. येथील जनाबाई आप्पा पेंढारे यांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराला कंटाळून जनार्दन आप्पा पेंढारे यांची हत्या करण्यासाठी संशयित समाधान दौलत भड यास सुपारी दिली होती.

जनार्दन आप्पा पेंढारे हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने त्यांच्या मानसिक विकृतपणापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी समाधान भड यास १५ हजार रुपयांची सुपारी देण्यात आली.

सदर संशयिताने ७ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जनाबाई आप्पा पेंढारे यांच्या घरातील लोखंडी पहारीने वार करून गंभीर जखमी करत खून केला. तसेच त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्थानिक विहिरीत फेकून दिला. स्थानिक शेतक-यांना मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून सदर घटनेचा तपास करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या