31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeक्राइमपोलिस अधिका-याचे पोलिस महिलेशी संबंध, बायकोने रंगेहाथ पकडले

पोलिस अधिका-याचे पोलिस महिलेशी संबंध, बायकोने रंगेहाथ पकडले

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्यप्रदेशात पोलिसालाच त्याच्या पत्नीने रंगेहाथ प्रेयसीसोबत पकडले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक असलेल्या पतीला तिने पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणातील पीडित महिलेला नव-यावर संशय होता. तो प्रेयसीसोबत ग्वाहलेरमधल्या एका फ्लॅटमध्ये असल्याचे माहिती तिला समजते आणि ती नातेवाईकांसह अचानक त्या फ्लॅटवर पोहचते आणि दरवाजा ठोठावते. त्यावेळी नव-याचे पितळ उघडे होते़ पत्नीला दारावर पाहिल्यानंतर तिच्या नव-याची आणि प्रेयसीची चांगलीच तारांबळ उडाली.

विशेष सांगायचे म्हणजे ती प्रेयसी देखील पोलिस कर्मचारी आहे. दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांनी सुरुवातीला दार उघडण्याचे टाळले, मात्र घराबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांना अखेर दार उघडावे लागले़ पीडित महिला आणि नातेवाईकांनी घराची पाहणी केल्यानंतर त्यांना घरात महिलेचे कपडे आढळले. सुरुवातीला नव-याने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रेयसी बाथरुममध्ये लपली होती.

महिलेच्या नातेवाईकांनी बाथरुमचा दरवाजा तोडण्याची धमकी दिल्यानंतर नाइलाजास्तव तिला बाहेर पडावे लागले. प्रेयसीला पाहताच पीडित महिला आणि नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यांनी दोघांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर मुरार ठाणे पोलिस ठाण्यात महिलेने या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक न करता सोडून दिल्याने पीडित महिलेने नाराजी व्यक्त केली आहे.

डिजिटल व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार यांनी साधला संवाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या