25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeक्राइमनिर्दयी आई-बापाने १३ दिवसांच्या बाळाला जंगलात पुरले

निर्दयी आई-बापाने १३ दिवसांच्या बाळाला जंगलात पुरले

एकमत ऑनलाईन

पुणे : वडगाव परिसरातील जंगलात एका १३ दिवसांच्या बाळाला आई-वडिलांनी पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या परिसरात जंगल आहे. तेथे खड्डा खोदून त्या बाळाला आई-वडिलांनी पुरले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वडगाव चौकी व सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाळ अपंग असल्यामुळे त्याला पुरल्याची शक्यता असून, आई-वडिलांचा शोध घेण्यात येत आहे

किल्लारीत पावसाचा रुद्र आवतार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या