18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्राइमनांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त एसीबीच्या ताब्यात

नांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त एसीबीच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्याकडे २८ लाख ७२ हजार ३६० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने याप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पुण्यातून पत्नी आणि मुलासह ताब्यात घेतले आहे. आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्या मालमत्तेची चौकशी केली. या उघड चौकशीअंती एसीबीने ठपका ठेवला आहे.

या प्रकरणात एसीबीचे पोलिस २०१० ते ३० जून २०१६ या शासकीय उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सेवेच्या कालावधीत लोकसेवकाच्या फिर्यादीवरून तत्कालीन अप्पर आयुक्त राम गगराणी यांची चौकशी केली. कायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत गगराणी यांच्याकडे अधिक मालमत्ता आढळली आली आहे.

या अधिकच्या मालमत्तेविषयी त्यांना स्पष्टीकरण देता येणार आहे. ही मालमत्ता ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ४५ टक्के अधिक होती. थोडक्यात २८ लाख ७२ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांनी संपादित केली हे चौकशीअंती उघड झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या