मीरारोड -ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नयानगर परिसरात गस्त घालत असताना संशया वरून त्यांनी दोघं तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडे एमडी हे अमली पदार्थ आढळले. पोलिसांनी आसिफ अली अफजर शेख (२४) व तारीक सिद्दीकी (२२) या दोघांना अटक केली असून आहे. आसिफकडे २५ ग्रॅम तर तारिककडे २० ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. अटक आरोपीना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके तपास करत आहेत.
१९ दिवसांत ६ हजार कोरोनाबाधित रुग्ण