16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्राइमतीन मैत्रिणींनी एकत्र घेतले विष

तीन मैत्रिणींनी एकत्र घेतले विष

एकमत ऑनलाईन

इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर येथे ३ अल्पवयीन मैत्रिणींनी विषारी गोळ्या प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात २ मुलींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिसरीची मृत्यूशी झूंज सुरू आहे.

राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रादेशिक उद्यानात ही घटना घडली. तिन्ही मुली मूळच्या आष्टा (जि. सिहोर) जवळच्या ग्रामीण भागातील रहिवासी होत्या.

या तिघींपैकी एक प्रियकर बोलत नसल्याने नाराज होती, तर दुसरी घरगुती वादामुळे त्रस्त होती. तर तिसरी दोन्ही जिवलग मैत्रिणींना अडचणीत पाहून अस्वस्थ होती. त्यामुळे या तिघींनीही सल्फासच्या गोळ्या घेतल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या