32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home क्राइम पिंपरीत तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त; तीन जणांना अटक

पिंपरीत तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त; तीन जणांना अटक

एकमत ऑनलाईन

पिंपरी – उसने घेतलेले पैसे परत देताना आरोपींनी दोन लाख 98 हजारांच्या बनावट नोटा एकाला दिल्या. मात्र ब्लॅक मनीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा घालून या नोटा हस्तगत केल्या. ही घटना खंडोबामाळ, आकुर्डी येथे रविवारी (दि. 16) रात्री घडली.

पोलीस कर्मचारी शहाजी वसंत धायगुडे यांनी सोमवारी (दि. 17) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन जणांना याप्रकरणी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीनच्या व्यवहारात गरज असल्याने आरोपींनी अभिषेक कटारिया यांच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. तीन महिने पैशाची मागणी करूनही आरोपी ते परत देत नव्हते. त्यानंतर आरोपींनी फोनही बंद करून ठेवला होता. मात्र कटारिया यांनी पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली.

आरोपींनी कटारिया यांना बनावट नोटा दिल्या. मात्र कटारिया यांनी आरटीजीएस किंवा बॅंकेत पैसे डिपॉझिट करण्यास सांगितले. मात्र आरोपींनी रोकड घेण्याचा आग्रह केला. तसेच दिलेल्या नोटा दोन नंबरच्या असल्याने त्या बाजारात आत्ताच फिरवू नकोस, असे सांगितले. तसेच आरोपींनी ओंकार जाधव यांनाही बनावट नोटा दिल्या.

दरम्यान, ब्लॅक मनीबाबत पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमएच-14-जीवाय-6060 या मोटारीतून दोन हजार रुपयांच्या 149 नोटा (दोन लाख 98 हजार रुपये) जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी या नोटा कोठून हस्तगत केल्या, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

निराशेचे मळभ दूर करून पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या