26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइमसासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक शहराजवळ असणा-या ओझर शहरातील सोनेवाडी येथील एका ३९ वर्षीय तरुणाने व्हीडीओद्वारे आपली व्यथा मांडत नंतर विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या ओझर परिसरातील सोनेवाडी येथे ही घटना घडली आहे. हिरामण अशोक लव्हान असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाने व्हीडीओमध्ये आपल्या सासरची मंडळी मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपली पत्नी, सासरा आणि मेहुण्याचे नाव घेत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे.

सासरचे लोक सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच बहिणीसाठी हा व्हीडीओ बनवत असून बहिणीने आईचा सांभाळ करावा असेही सांगितले आहे. तसेच आपल्या अन्त्यविधीस आपल्या सासरच्या मंडळींना येऊ देऊ नये असे सांगताना हिरामण लव्हान यांना अश्रू अनावर झाल्याचे व्हीडीओत पाहायला मिळते आहे.

हिरामण लव्हान आपल्या कुटुंबासह सोनेवाडी परिसरात वास्तव्यास होता. याच परिसरात राहणा-या सासरच्या मंडळींकडून त्याला सतत टॉर्चर करण्यासह मारहाण करण्यात येत होती. बुधवारी त्याने शेतात जाऊन व्हीडीओ रेकॉर्डिंग केले. यामध्ये त्याने सासरच्या मंडळींची नावे घेत आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या