17.4 C
Latur
Monday, January 25, 2021
Home क्राइम मामाने धमकावून अल्पवयीन भाचीवर केला बलात्कार

मामाने धमकावून अल्पवयीन भाचीवर केला बलात्कार

एकमत ऑनलाईन

लखनौ: उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील एका गावात शनिवारी रात्री आजीसोबत झोपलेल्या नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्याच मामाने जंगलात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री गावात राहणारी एक नऊ वर्षाची मुलगी आपल्या आजीसमवेत नेहमीप्रमाणे झोपली होती. त्याच वेळी मुलीचा सख्खा मामा चंदू याने बलात्कार केला.

दरम्यान, बलात्कारानंतर आरोपीने मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील जंगलात सोडून फरार झाला होता. ग्रामस्थांच्या माहितीवरून रविवारी सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना जंगलातून मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी पोलिसांनी तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे.

एसएचओने सांगितले की, या संदर्भात मुलाच्या वडिलांच्या तक्रारारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी मामाला अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे.

दुसरीकडे चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप येथेही अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील एका गावात दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या मामाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भरतकूप पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संजय उपाध्याय यांनी सांगितले की, ‘दहा वर्षीय मुलीच्या मामाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना २० जूनच्या रात्री घडली होती. परंतु याप्रकरणी २७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे २० जून मुलगी आपल्या आईसह आपल्या एका लग्नासाठी आजीच्या गावी आली होती. त्यावेळी ती रात्री टेरेसवर झोपलेली असतानाच तिच्या मामाने धमकावून तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला या संपूर्ण प्रकाराने घाबरलेल्या मुलीने त्यावेळी घटनेची कोणालाही माहिती दिली नाही, परंतु २४ जूनला जेव्हा मुलगी आपल्या गावी पोहोचली तेव्हा तिची तब्येत बिघडली, त्यानंतर मुलीने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मामाला अटक केली आहे.

Read More  संपादकीय : बळीराजाच्या पाठी शुक्लकाष्ठ !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या