23.2 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeक्राइमवल्लाह हबीबी!!! मृत व्यक्ती जिवंत

वल्लाह हबीबी!!! मृत व्यक्ती जिवंत

एकमत ऑनलाईन

केरळ : केरळमधील अर्नाकुलममध्ये फोटोग्राफर पोलिसांच्या सांगण्यानुसार एका मृतदेहाचा फोटो काढत होता. मात्र फोटो काढत असताना एक विचित्र प्रकार घडला. फोटो काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्याला अचानक आवाज यायला लागले. जेव्हा तो मृतांच्या जवळ गेला तेव्हा त्याला कळले की हा आवाज याच व्यक्तीच्या तोंडातून येत आहे. फोटोग्राफरने तातडीने पोलिसांना सांगितले. यानंतर, ही मृत व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आले आले आहे.

शिवदासन असे मृत ठरविलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवदासन मृत असल्याचे घोषित करुन पोलीस पुढील कारवाईही करणार होते. फोटोग्राफर टॉमी थॉमस जेव्हा मृतदेहाचा फोटो काढण्यासाठी जवळ गेले, तेव्हा त्यांना आवाज येऊ लागले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहित दिल्यानंतर शिवदासन जिवंत असल्याचे कळले. त्यानंतर मात्र, पोलिसांची भंबेरी उडाली. सध्या शिवदासन यांना त्रिशूरच्या ज्युबिली मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शिवदासन पलक्कडमधील कलामासेरीजवळ भाड्याच्या घरात एकटे राहत होते.

त्यांच्या घरातून विचित्र येऊ लागले म्हणून शेजारचे तेथे गेले. तेव्हा त्यांना शिवदासन मृत अवस्थेत आढळून आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर ही सर्व घटना घडली होती.

Read More  कर्नाटक सरकार : प्लाझ्मा दात्याला ५००० रुपये देणार

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या