31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम व्हिडिओ लिंक ब्लॅकमेलचे सापळे

व्हिडिओ लिंक ब्लॅकमेलचे सापळे

एकमत ऑनलाईन

पुणे : ओटीटी प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाइटवर जाऊन नुकत्याच गाजलेल्या वेबसीरीज किंवा चित्रपट पाहण्याचा मोह घातक ठरु शकणार आहे. अशाच व्हिडिओ लिंकद्वारे तुमच्या मोबाइलमधील सर्व प्रकारची माहिती चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या वर्षभरात अशा काही घटना समोर आल्याने पोलिस आणि सायबर तज्ज्ञांनी या लिंकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

अनेकदा नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या वेबसीरीज आणि चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. सगळ्यांकडे असे सबस्क्रिप्शन नसते. वेबसिरीज आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच टेलिग्रामसारख्या अ‍ॅपवर या वेबसीरीजच्या शॉर्ट लिंक येतात.

ओटीटी प्लॅटफॉर्म हॅक करून हा आशय मिळवलेला असतो. ही लिंक उघडली की चित्रपट किंवा सीरीज पाहता येते मात्र त्या आडून जे केले जाते ते अधिक घातक असल्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला. संबंधित लिंकमध्ये पे लोड नावाचा प्रकार सेट करण्यात येतो. याद्वारे एखाद्या हॅकर नागरिकांच्या मोबाइलमधील सर्व माहिती मिळवू शकतो. एकदा का मोबाइलवर हॅकरचे नियंत्रण आले की, मोबाइलमधील माहितीच्या आधारावर ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू होतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

तिढा सोडवायला हवा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या