22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्राइमबायकोचे प्रियकरासोबत लग्न; नव-याकडून आत्महत्येचा प्रयत्न

बायकोचे प्रियकरासोबत लग्न; नव-याकडून आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : तीन मुले पोटाला असूनही पाच महिन्यांपूर्वी फरार झालेल्या बायकोचे प्रियकरासोबतचे दुस-या लग्नाचे फोटो पाहून मुळापासून हादरलेल्या नव-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका गावामध्ये घडली.

बायकोने स्वत: दुस-या लग्नाचे फोटो नव-याच्या मोबाईलवर पाठवून दिल्याने पती अत्यंत निराश झाला होता. त्यामुळे स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याच्या तीन मुलांनी आजीच्या मदतीने वडिलांना सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर कालही त्याने पुन्हा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे तिन्ही मुलं यावेळी चिंताग्रस्त होऊन रुग्णालय परिसरात फिरत असताना अनेकांचे मन हेलावले. यानंतर त्या मुलांच्या आत्याने येऊन मुलांना आधार दिला.

या दाम्पत्याला तीन मुलं आहेत. तिन्ही मुलांसह मोलमजुरी करून सुखाने संसार सुरू असतानाच पत्नीचे एकाशी प्रेम जुळले. या संबंधातूनच पत्नीने प्रियकरासोबत पाच महिन्यांपू्वी पलायन केले. यानंतर पत्नी हरवल्याची तक्रारही पतीने केली होती, पण पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याचे त्याने सांगितले. पत्नीने पळून गेलेल्या प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पतीच्या मोबाईलवर पाठवून दिले होते. त्यामुळे पतीला चांगलाच धक्का बसला. त्यामुळे निराश झालेल्या पतीने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या