27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत दरोडेखोराकडून महिलेवर अत्याचार

औरंगाबादेत दरोडेखोराकडून महिलेवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज भागातील जिकठाण शिवारात एक संतापजनक घटना समोर आली असून, भाजी आणण्यासाठी शेतात गेलेल्या ५८ वर्षीय महिलेला एकटी गाठून नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या घटनेनंतर गुन्हे शाखा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. शक्तूर लक्षाहरी भोसले (वय २५, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून, तो रेकॉर्डवरील दरोडेखोर असल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज भागात राहणारी ५८ वर्षीय शेतकरी महिला दुपारच्या सुमारास वाळूज गावात आठवडी बाजाराला गेली. तर बाजार करून दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या खासगी वाहनाने लिंबेजळगावपर्यंत गेल्या आणि तेथून पायी जिकठाण शिवारातील शेतात गेल्या. दुस-या दिवशी नवरात्रीचे उपवास सुटणार असल्याने त्यांनी उपवास सोडण्यासाठी लागणारी आंबाड्याची भाजी शेतातून घेतली.

त्यानंतर त्या घराकडे पायी निघाल्या असतानाच एक अनोळखी समोरून आला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून त्यांना बाजूच्या कपाशीच्या शेतात ओढत नेले.

आरोपीने या महिलेला शेतात ओढत नेऊन, अंगावरील दागिने देण्यासाठी धमकावले. महिलेने त्याला विरोध करताच त्याने तोंड, पोट आणि पाठीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ३ ग्रॅमचे मंगळसूत्र व १ ग्रॅमचे कानातील कुडके ओरबाडून घेतले. महिलेने आरडाओरड केली, मात्र आसपास कोणीही नसल्याने मदतीसाठी कोणी आले नाही. नराधम आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या