26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्राइमजामगावला दाम्पत्याकडून महिलेस दगडाने मारहाण

जामगावला दाम्पत्याकडून महिलेस दगडाने मारहाण

एकमत ऑनलाईन

बार्शी : जावयाविरुद्ध पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून एका दाम्पत्याने एका महिलेच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना बार्शी तालुक्यात जामगाव येथे घडली.
याबाबत लक्ष्मी सुनील अडसूळ यांनी फिर्याद दिली असून २ जुलै २०२२ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या

सुमारास फिर्यादी महिलेच्या घरासमोर जामगाव (आ) येथे ही घटना घडली. याप्रकरणी हरी नवनाथ अडसूळ व त्याची पत्नी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी हरी अडसूळ यांच्या जावयाविरुद्ध फिर्यादी महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून हरी अडसूळ व त्याची पत्नी यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन

शिवीगाळ करू लागले. त्यावेळी शिवीगाळ का करता असे विचारले असता तुझ्या सुनेने आमच्या जावयाविरुद्ध पोलिसात तक्रार का दिली, या कारणावरून तिच्या अंगावर जाऊन हरी अडसूळ याच्या पत्नीने फिर्यादीला घट्ट पकडले. हरी अडसूळ याने तिच्या डोक्यात दगड मारून जबर जखमी केले. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब लोहार हे करीत आहेत…

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या