31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम तरुणीचे अपहरण करून बलात्कार

तरुणीचे अपहरण करून बलात्कार

एकमत ऑनलाईन

पुणे : खराडी परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाºया तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर येथे रस्त्यात अडविले. जबरदस्तीने दुचाकीवरून खराडी परिसरात घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धानोरी परिसरातील एका २० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करते. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी येत होती. ती घरी निघाल्यानंतर तिचा आरोपीने पाठलाग सुरू केला. तिला टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून त्याच्या दुचाकीवर बसविले.

तरुणीला पुन्हा खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला गुंजन चौक परिसरात आणून सोडले. तिने मित्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कार, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लाल मुंग्यांच्या चटणीने कोरोना बरा होऊ शकतो?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या