देशातील ४५ टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले

नवी दिल्ली : भारतासारख्या देशात अजूनही मोठ्या संख्येने जनता दारिद्रयरेषेखाली जगत आहे. मात्र, देशात असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही. अलीकडेच, देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा एक नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

देशातील ४५% मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यातील चार अब्जाधीश आहेत. ही माहिती एडीआर अहवालातून उघड झाली आहे. देशातील अनेक मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून ३१ मुख्यमंत्र्यांविषयी काही महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. या ३१ मुख्यमंत्र्यांपैकी चार जणांकडे १०० कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी प्रसिद्ध केलेला नवा अहवाल देशातील सर्वोच्च राजकारण्यांच्या आर्थिक परिस्थितीचे चित्र सादर करतो. हा अहवाल मागील निवडणुकीदरम्यान सर्व ३१ विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, ३१ पैकी १४ मुख्यमंत्र्यांनी (४५%) त्यांच्यावर दाखल असलेले फौजदारी खटले जाहीर केले आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या १४ मुख्यमंत्र्यांपैकी ११ जणांवर अत्यंत गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत. या गंभीर प्रकरणांमध्ये हत्येचा प्रयत्न(भारतीय दंड संहितेचे कलम ३०७), लाचखोरी आणि गुन्हेगारी धमकी यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. वृत्तानुसार, दोन मुख्यमंत्र्यांवर हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर आरोप आहेत.

सामान्यांपेक्षा पुढा-यांची संपत्ती अधिक
भारतीय राजकारण्यांची संपत्ती सामान्य नागरिकांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असल्याचे मानले जाते. ताज्या अहवालातून हे नेते श्रीमंत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सर्व ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण घोषित संपत्ती ३,६६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देशातील एका मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ११८.०७ कोटी रुपये आहे.

४ जणांची १०० कोटींपेक्षा अधिक
या ३१ मुख्यमंत्र्यांपैकी चार जणांची, म्हणजेच १३ टक्क्यांची संपत्ती १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच त्यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे. शिवाय, अहवालात मुख्यमंर्त्यांचे स्वत:चे सरासरी उत्पन्न ६.५४ कोटी असल्याचे नमूद केले आहे, तर सर्व ३१ मुख्यमंत्र्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न २०३ कोटी आहे.

एडीआरचे महत्वपूर्ण कार्य
एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, ही निवडणूक सुधारणांसाठी काम करणारी प्रमुख संघटना आहे. निवडणूक लढवणा-या उमेदवारांविषयी, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता आणि शिक्षणासह अचूक माहिती जनतेला देणे हे तिचे मुख्य कार्य आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news