इंदूरीकर महाराजांच्या लेकीच्या राजेशाही साखरपुड्यावरून टीका

मुंबई : राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या आगळ्यावेगळ्या किर्तन शैलीमुळे चर्चेत असतात. किर्तनांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज समाजात जनजागृतीचे काम करतात. शेतक-यांची स्थिती, लग्न, घरात होणारी सासू-सुनेचे भांडणे या प्रश्नांवर ते आपले परखड मत मांडत असतात. अलिकडेच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. यावरून डब्बेवाला संघटनेने इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका केली आहे.

सध्याच्या काळात मोठ्या धामधुमीत लग्न केले जाते. यावर बोलताना इंदुरीकर महाराजांनी अनेकदा भाष्य करताना ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्या पद्धतीने करा, साध्या पद्धतीने लग्न केले तरी मुलं होतात असं विधान केलेले आहे. मात्र आता या विधानावरून मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जोरदार टीका केली आहे. दुस-यांना अक्कल शिकवणा-या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला असा आरोप तळेकर यांनी केला आहे.

सुभाष तळेकर यांची इंदुरीकर महाराजांवर टीका
मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर इंदुरीकर महाराजांवर टीका कराताना म्हटले की, ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते, तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण एक बोलता परंतु त्याचा जीवनात अवलंब करत नाही, याचा खेद वारकरी सांप्रदायाला आहे. निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर सांप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता.

इंदुरीकर महाराजांचा जावई नेमका आहे कोण?
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मुळचे रहिवासी आहेत, ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news