बेळगावमध्ये इंजिनीअरच्या घरात कोट्यवधींचं घबाड!

बेळगाव : कर्नाटकच्या बेळगावमध्ये एका इंजिनीअरच्या घरात अफाट संपत्ती असल्याचे उघडकीस आले आहे. ‘सिटी डेव्हलपमेंट सेल’मधील असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर अजय सिंह राजपूत याच्याकडे १४ कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचे लोकायुक्त अधिका-यांनी उघड केले आहे. या अफाट संपत्तीची तपासणी करण्यासाठी पथकाला तब्बल दोन दिवस लागले.

दोन दिवस चाललेल्या या कारवाईत अंजनैया नगर येथील त्याचे निवासस्थान, कार्यालय परिसर आणि बँक लॉकरसह एकूण सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान अधिका-यांना बेळगावमध्ये तीन घरं आणि सवदत्ती, हुबळी व हुक्केरी येथे १८ प्लॉट्स आढळले आहेत.

महागड्या लक्झरी कार आणि बाईक्स जप्त
छापेमारीत ६ किलो सोनं, ५ किलो चांदी, ३.१२ कोटी रुपये, तसेच महागड्या लक्झरी कार आणि बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक कमावलेल्या मालमत्तेवर अधिका-यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

दिल्लीमध्ये ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ‘अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी हे प्रकरण निगडित आहे. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाच्या पथकाने १० एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी दिल्ली आणि गुरुग्राममधील १० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने, सोन्याच्या विटा आणि महागडी घड्याळं जप्त करण्यात आली आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news