28.4 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्र  मंत्रालयात महिला कर्मचा-यांचा डान्स?

  मंत्रालयात महिला कर्मचा-यांचा डान्स?

विरोधी पक्षनेत्यांची टीका, व्हीडीओ व्हायरल

मुंबई : संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालतो. त्याच मंत्रालयामध्ये महिलांच्या डान्सचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाव्हीडीओ मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील आहे, आणि ज्या महिला डान्स करत आहेत त्या महिला प्रशासनाच्या कर्मचारी असल्याचे बोलले जात आहे, मात्र या व्हीडीओबाबतची आणखी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मंत्रालय हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र आहे, राज्यभरातील सामान्य नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. मात्र, अनेकदा कामे होत नसल्याची तक्रार सामान्य नागरिक करत असतात. तर जी कामे होतात ती विलंबाने होतात, एका कामासाठी नागरिकांना सतत मंत्रालयाचे हेलपाटे घालावे लागतात अशा तक्रारी सर्वसामान्य नागरिकांकडून वारंवार करण्यात येतात.

मात्र, या ठिकाणी महिला कर्मचारी मंत्रालयात कामाच्या वेळेत, चक्क डान्स करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता मंत्रालय प्रशासन दखल घेणार का? या प्रकरणी राज्य सरकार कारवाई करणार का हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ज्या महिला डान्स करत आहेत, त्या कर्मचारीच आहेत का? याबाबत माहिती नाही.

याबाबत प्रतिक्रिया देताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मंत्रालय हे लोकांचं काम करायचं ठिकाण आहे. तिथे नाचगाणे चुकीचे आहे’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर नाचगाणे करावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. पण, मंत्रालय हे नाचगाणं करण्याचं ठिकाण नाही, असेही ते पुढे म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR