26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा अवकाळीचा धोका!

राज्यात पुन्हा अवकाळीचा धोका!

पुणे : देशासह राज्यात थंडीची वाट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा अवकाळीचा धोका असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता हवामान बदलामुळे पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

राज्यात अनेक भागात पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे, तर दिवसा तापमानात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पुण्यात पाऊस?
महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR