23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रदशरथ पाटलांची निवडणुकीतून माघार

दशरथ पाटलांची निवडणुकीतून माघार

नाशिक : लोकसभा निवडणुकूची घोषणा झाल्यापासूनच नाशकात रोज नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या ंिरगणातून माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे विजय किसन करंजकर(अपक्ष)यांच्या वतीने रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचं चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज होते. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर हे बंडखोरी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विजय करंजकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजय करंजकर यांच्या उमेदवारीमुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या अडचणी वाढणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR